पुणे शहर

नॅन्सी होम ते लेक टाउनशिप होम रस्त्याला माजी नगरसेवक कै. बालाजी तेलकर पथ नामकरण; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्याचे माजी नगरसेवक कै. बालाजी तेलकर यांचे  नाव नॅन्सी होम ते लेक टाउनशिप होम या रस्त्याला देण्यात आले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले . या वेळी सर्व पक्षाचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते . प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे , माजी महापौर दत्ता धनकवडे , माजी उपमहापौर दीपक मानकर , दत्ता सागरे , काँग्रेस पक्षाचे अभय छाजेड , मनसेचे  नगरसेवक वसंत मोरे व शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी बालाजी यांच्या सोबत असलेल्या मैत्री आणि अनेक आठवणी सांगितल्या . हा रस्ता वळणाचा आणि चढ -उतार चा आहे , बालाजींच्या आयुष्यात   ही अनेक चढ – उतार आले त्याला त्याने धीराने तोंड दिले , असे मत त्यांनी व्यक्त केले . नगरसेवक वसंत मोरे यांनी बालाजींच्या अचानक जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले व मित्र गमावल्याचे दुःख व्यक्त केले . 

पुण्यात रस्त्यावरील चेंबर मध्ये १५ फूट खोल खड्ड्यात पडला माणूस..

https://fb.watch/8p5xmZx-Wn/

महापौर मोहोळ यांनी महानगर पालिकेतील अनेक आठवणी सांगितल्या तसेच अजून एखादया रस्त्याला  किंवा बागेला बालाजीचे नाव देण्याचा भविष्यात विचार करू असे आश्वासन दिले.यावेळी नॅन्सी होम सोसायटी , विष्णुपुरा वाड्यातील रहिवासी , समाज बांधव  , मित्र परिवार तसेच जवळ चे नातेवाईक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.सर्वाचे आभार जेष्ठ बंधू अविनाश तेलकर यांनी मानले .

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये