पुणे शहर

चला सहभागी हाऊयात वारजे टेकडी हरित करूयात ; दिपाली धुमाळ यांचे वारजेकरांना आवाहन..

वारजे : वारजे टेकडीवर किमान दहा हेक्टर व त्याही पेक्षा जास्त जागेवर वनविभाग व आपल्या परिसरातील नागरिकांच्या सहभागातून ६ हजाराच्यावर देशी झाडे लावण्याचा व संगोपन करण्याचा संकल्प माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात आला आहे. या संकल्पनेतून वृक्ष लागवडीचा शुभारंभ ही करण्यात आला आहे. या वृक्ष लागवड व संगोपन महायज्ञामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे व वारजे माळवाडी परिसराचे पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुढे यावे असे आवाहन धुमाळ दांपत्याच्या वतीने करण्यात आले आहे.

वारजे परिसरातील अनेक सोसायटीतील सभासद, स्वयंसेवी संस्था, निसर्ग प्रेमी , वृक्ष प्रेमी , अनेक सामाजिक संघटना, मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला भगिनी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सध्या आपण पहातोय की सगळी कडे सिमेंटचे जंगल वाढत आहे त्यामूळे पर्यावरणाचा र्‍हास होताना दिसत आहे. दिवसेंदिवस पावसाचा प्रमाण कमी होत चालले आहे.

नागरिकांना दुषित हवामान व वातावरणामध्ये जीवन जगावे लागत आहे. पुरेसा आरोग्याला ऑक्सिजन मिळत नाही. अशा गंभीर परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर व मोकळा श्वास घ्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. आणी म्हणूनच याची दखल घेऊन वनविभाग व आपण आपल्या इशाननगरी जवळच्या टेकडीवर देशी झाडांची लागवड करीत आहोत. या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला तर ६ हजार वृक्ष लागवडीचा टप्पा लवकर पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले धरणी मातेच्या संगोपना बाबत असलेले कर्तव्य बजवावे असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

जर एखाद्या सोसायटीला अथवा ग्रुपला स्वतंत्र काही ठराविक जागा पाहिजे आसेल तर त्यांना तशा प्रकारची ठराविक क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाईल व त्याठिकाणी त्याच्या सोसायटीचे नाव अथवा ग्रुपचे नाव दिले जाईल, की जेणेकरून आपापसात स्पर्धेचे स्वरूप देता येईल. अशा उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी अधिक माहिती व संपर्कासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ व माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी केले आहे.

संपर्क : 7709874302
श्री.प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ जनसंपर्क कार्यालय

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682
Img 20230708 wa0003
Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये