राजेंद्र वाघ यांच्या श्रमिकांचं गोंदण या कविता संग्रहाचे प्रकाशन..

पिंपरी : श्रम उद्योग परिषद या कार्यक्रमात कवी राजेंद्र वाघ यांच्या श्रमिकांचं गोंदण या कविता संग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ,मनोहर पारळकर ,पुरुषोत्तम सदाफुले, सुदाम भोरे, राजेश कोठावदे, विक्रम मिरजगावकर, काशिनाथ नखाते, सखाराम रेडेकर, किशोर हिंगे, पुरुषोत्तम सदाफुले, प्रकाशक दिपक चांदणे तसेच कवी राजेंद्र वाघ व रंजना वाघ उपस्थित होते. प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे यांनी हा काव्य संग्रह प्रकाशित केला आहे.
राजेंद्र वाघ हे कोथरुड मधील कमिन्स कंपनीमध्ये कामाला असून नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून दिला जाणारा कामगार भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. वाघ यांचे अनेक कविता संग्रह या आधी प्रकाशित झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव सातपुते यांनी केले तर आभार सुदाम भोरे यांनी मानले.
श्रमिकांच्या सुख दुखांची साक्ष देणारी कविता : फ.मुं.शिंदे
श्रमिकांचं गोंदण या कविता संग्रहाबाबत कवी फ.मुं.शिंदे यांनी म्हंटले आहे की, राजेंद्रची कविता ही श्रमिकांच्या सुख दुखांची साक्ष आहे. ही साक्ष जशी कष्टाची आहे तशी समष्टीचीही आहे. ती कल्पनेच्या आभासी जगात न रमता वास्तवतेच्या शृंखला तोडत समाजाला जोडत जाते. हा कवी श्रमिकांच्या वेदनांवर आक्रांताने लिहितो. हे लिहिणे म्हणजे तरी दुसर तिसरं काय असतं ; ही श्रमाप्रतीची ओढ असते. ओढ असो की खोड शेवटी माणसाला त्यातून मुक्त व्हावाच लागत. ही मुक्ती जशी धारणेची असते, तशी करुणेची असते.




