महाराष्ट्र

माती आणि मातेला विसरू नका- मुख्यमंत्र्यांचा सल्ला

मुंबई: प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेली महाराष्ट्राची मुले भविष्यातील जबाबदारीची परीक्षा देखील जिद्दीने पार पाडतील. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना त्यांनी माती आणि मातेला विसरू नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या मुलांना दिला.

लोकसेवा आयोग मार्फत २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये