पुणे शहर

आयुष्यावर बोलू काही मधील गीतांनी कोथरुडकरांची संध्याकाळ यादगार..

शंकर केमसे यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भुसारी कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात आयुष्यावर बोलू काही हा काव्य आणि गीतांचा सदाबहार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सादर झालेल्या बाल व नात्यांवर भाष्य करणाऱ्या गीतांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

माजी सभागृहनेते शंकर केमसे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सादर झालेल्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमात कवी संदीप खरे व गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांनी आपल्या गीतांनी कोथरुडकरांची संध्याकाळ यादगार बनवली.

अगो बाई ढ ग्गो बाई, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलच होत आई, याबरोबरच तुझ बघता सारा हिशोब चुकला होता, चांदण्यात फिरताना, आली लाजत लाजत ठुमकत शुक्राची चांदणी, अशा गीतांनी रसिकांची दाद मिळवली.

Img 20211211 181833
Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये