राजकीय
राज ठाकरेंचा 29, 30 एप्रिलला पुणे दौरा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केला आहे. 29, 30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहेत.
राज ठाकरे 29, 30 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहे. मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर झाली चर्चा झाली. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली. 3 मे 2022 रोजी होणाऱ्या महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे. एक मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरे जाहीर सभा नियोजित आहे.




