पुणे शहर

अनलॉकनंतरही महात्मा सोसायटीचा रस्ता बंदच; रस्ता खुला करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : महात्मा सोसायटी परिसरातील रस्ता खुला करण्यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांकडून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र  हा रस्ता वेल्डींग करून बंद करण्यात आल्याने नागरिकांचा प्रयत्न फोल ठरला.

‎महात्मा सोसायटी परिसरातील सुमारे २० वर्षापासून ११ सोसायटी मधील  नागरिक वापरत असलेला रस्ता लॉकडाऊन पासून  बंद केला होता.सर्व  गोष्टी खुल्या होत असताना रस्ता मात्र  अजूनही बंद होता  या रस्त्याचा वापर करणे हा नागरिकांचा संपूर्ण आणि कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने खुला करावा. अशी मागणी गोरडे यांनी केली आहे.

या भागात उभ्या राहिलेल्या इमारती ना हा रस्ता असल्याने त्यानुसार इमारती ना महापालिकेचे  पूर्णत्वा चे दाखले देण्यात आले आहेत. गेली अनेक वर्षे हा रस्ता नागरिक वापरत आहेत आणि अचानक तो कोणतेही कारण न देता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे  स्थानिक नागरिकांना  विनाकारण खूप त्रास  सहन करावा लागला आहे

या भागात रहाणा-या नागरिकांचा वहिवाटीचा रस्ता आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.  स्थानिक नागरिकांनी राजाभाऊ गोरडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी  रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला.अनेक महिन्यापासुन बंद  करण्यात आलेला रस्ता   खुला करावा या मागणीसाठी गोरडे यांच्यासोबत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी  रस्ता  खुला करण्याचा  प्रयत्न करण्यात आला. मात्र रस्ता वेल्डिंग करुन बंद केला असल्याने रस्ता खुला करता आला नाही.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये