पुणे शहर
युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांचा सत्कार

पुणे : देहूरोड शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने युवासेना विस्तारक व नवनियुक्त संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच देहूरोड शहर युवासैनिकांचा जाहीर प्रवेश व युवासेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व शिवसेना,युवासेना शाखा नामफलकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर ,खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम,,जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,तालुका संपर्कप्रमुख गणेश जाधव,तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,विशाल हुलावळे,शैलेजा खंडागळे,युवासेनेचे विशाल हुलावळे,विशाल दांगट , संदीप भुंबक उपस्थित होते.युवासेना तालुका प्रमुख अनिकेत घुले व शहरप्रमुख भरत नायडू यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते .



