पुणे शहर

पुण्याच्या महापौर पदी मंजूषा नागपुरे यांची निवड निश्चित…

पुणे: पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून  करण्यात आली आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं भाजपनं जाहीर केलं. मंजूषा नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी विराजमान झाल्या आहेत, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत . आता महापौर पदी मंजुषा नागपुरे यांची निवड झाल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. 

आज पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत या नावांची घोषणा केली. तसेच आता पुण्याच्या महापौर व उपमहापौर निवडीनंतर फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका,  अशा सूचना भाजपाकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही पद्धतीचे बॅनर किंवा फटाके लावू नका, याबाबतच्या सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या आहेत.

Img 20251125 wa01782121520512185783132

महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत, पुणे पालिकेच भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली होती. 119 महिलांना संधी दिली होती. त्यापैकी 50 पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

पुणे महापालिकेत पार पडलेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीला वर्षा तापकीर गैरहजर असल्याची माहिती आहे. महापौर पदासाठी वर्षातील यांचे नाव चर्चेत होते. शेवटच्या क्षणी वर्षा तापकीर यांचे नाव डावल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपूरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, वर्ष तापकीर या सलग चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये