मराठा आरक्षण पुढील सुनावणी २८ ऑगस्टला

मराठा आरक्षण पुढील सुनावणी २८ ऑगस्टला
मुंबई : मराठा आरक्षणा बाबतच्या याचिकांची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी.याबाबतची चर्चा आज सुप्रीम कोर्टात झाली. या विषयाची पुढील सुनावणी २८ ऑगस्टला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारची बाजू न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मांडली आहे. पुढील सुनावणीच्या वेळेस राज्य शासनाचे वकील परमजीत सिंग पटवालिया सरकारची बाजू मांडतील अशी माहिती महाविकास आघाडीचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर च्या माध्यमातून दिली आहे.
महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या रोहतगी यांनी
मराठा आरक्षण प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे तर मराठा आरक्षण प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी देखील केला आहे.



