व्हायरल व्हिडिओ
पाहा व्हायरल व्हिडिओ : चिमुकल्याने शिक्षिकेचे केले असे कौतुक

पुणे : मानवी जीवनात जी पवित्र नाती मानली जातात, त्यापैकी एक नाते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते. त्यात विद्यार्थी लहान असेल तर त्याच्या निरागसतेने हे नाते अधिकच खुलते. असाच एका निरागस विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.

शिक्षिकेने घातलेली साडी खूप छान दिसत असून तुम्ही माझ्या आवडत्या शिक्षिका असल्याचे तो चिमुकला आपल्या शिक्षिकेला सांगत आहे. लहान मुले किती निरागस असतात आणि ते आपल्या शिक्षकांवर किती प्रेम करतात हेच या व्हिडिओतून दिसून येत आहे.



