पुणे शहर

वारजेत महीला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू ; दिपाली धुमाळ यांचा उपक्रम

वारजे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वारजे माळवाडी मधील महिलांसाठी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा शुभारंभ आज महिलादिनी करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त कोर्सच्या पहिल्या दिवशी दिपाली धुमाळ यांनी सहभागी महिलांचा गुलाब पुष्प देऊन
सन्मान केला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या मनोगतामधून अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. आपल्या या प्रशिक्षणाची गरज व त्याचा कसा लाभ घ्यावा हे समजून सांगितले. या प्रसंगी उपस्थित महिलांनी दिपाली ताई व बाबा धुमाळ यांचा असा महिलांसाठी असा स्तुत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल आभार मानले.

दिपाली धुमाळ म्हणाल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला मिळालेला प्रतिसाद पाहता महिलांमध्ये इंग्रजी शिकण्याची आवड दिसून येते. केवळ वेळ आणि योग्य संधी न मिळाल्याने ज्यांना हा कोर्स करणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम म्हणजे सुवर्ण संधी आहे.

पहिल्या बॅच साठी पन्नास महिला सहभागी झाल्या आहेत. जंगम सर, नंदकुमार बोधाई, महादेव गायकवाड, जयंत मोहिते, डी के जोशी , सुरेश जाधव, मानसी नलावडे यांनी समन्वयक म्हणून काम केले. वारजे तील गंगाबाई धुमाळ उद्यानातील सभागृहात हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

Img 20230308 wa0000
Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये