महाराष्ट्र

भाजप आमदाराकडून मृत व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप; राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई : मागासवर्गीय समाजातील मृत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे (Duplicate Documents) बनवून जमीन लाटण्याचा प्रकार माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) आक्रमक झाली असून राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (2 मे) सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

मागासवर्गीय समाजातील लोकांच्या जमिनी जर लोकप्रतिनिधीच काढून घेत असतील तर ही लोकशाही धोक्यात असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही शांत बसणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये दहिवडी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांना तात्काळ अटक व्हावी व एकंदरीत मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या या कृत्यामुळे एकंदरीतच भाजप चा मनुवादी चेहरा जनतेसमोर आलेला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये दलित आदिवासी व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढत चालले आहेत. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही पण तशाप्रकारचा अत्याचार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही कदापी होऊ देणार नाही, असा निर्धार महेश तपासे यांनी व्यक्त केला.

Img 20220428 wa0008 1
Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये