पुणे शहर

विहीरींच्या संवर्धनासाठी धोरण आखावे आमदार शिरोळे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी

पुणे: राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गिरीप्रेमींसाठी किल्ले, गड भटकंतीसाठी खुले केले याबद्दल  आभार मानण्यासाठी आमदार शिरोळे यांनी गिरीप्रेमी उमेश झिरपे आणि एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांच्यासमवेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पर्यटन खात्याने प्रस्तावित केलेल्या जी.आर. मसुद्यात साहसी क्रीडा प्रकार आणि साहसी पर्यटन यात गल्लत करण्यात आली आहे.ती दूर करून साहसी क्रीडा प्रकार क्रीडा खात्याकडे ठेवावा आणि साहसी पर्यटन हा विषय पर्यटन खात्याकडे वर्ग करावा, असे आमदार शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले.

Img 20201024 wa0166 1
Screenshot 2020 11 11 14 39 45 52

तसेच राज्यातील नदी संवर्धन, विहीरींचे सर्वेक्षण यावर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली. पुणे शाहर आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या विहीरींचे संरक्षण व्हावे, नवीन विहीरींचे संवर्धन याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवावे अशा मागणीचे निवेदन आमदार शिरोळे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.

Img 20201028 wa0145

नदीकाठी असलेल्या मंदिरांमधील निर्माल्याचे खत करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे, त्यातून मंदिरांना उत्पन्न मिळेल आणि नदीत होणारे प्रदूषण टळेल. नदी आणि नदीकाठच्या जैववैविध्य ठेव्याचे जतन होईल. मंदिरातील निर्माल्याचे खत पवित्र भावनेने शेतकरी घेतील, असेही निवेदन आमदार शिरोळे यांनी दिले. यावर विचार करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

Screenshot 2020 1113 160133
Screenshot 2020 1113 155814
Screenshot 2020 1113 155747

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये