राष्ट्रीय
‘मोदींचा क्लासमेंट आणि
‘मोदींचा क्लासमेंट आणि
चहाचा ग्राहक शोधा….’

पाटणा : बिहारच्या प्रचारात आरोप- प्रत्यारोप, शाब्दिक कोट्या यांना उधाण आले आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडीच्या प्रचारावर टीका करताना मोदींनी त्याला डब्बल डब्बल इंजिन असे वर्णन केले होते. यावर तुम्ही तर ट्रबल इंजिन आहात, असे प्रतिउत्तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी दिले.
काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पृथ्वीवर या दोन व्यक्तींना शोधणे अशक्य आहे. एकतर मोदींचा क्लास मेट आणि दुसरा मोदींच्या हातून चहा घेतलेला ग्राहक! असे सिन्हा यांनी ट्विटवर म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.







