पुणे शहर

सात हजार पेक्षा जास्त मुलींचे कोथरूडमध्ये महाकन्या पूजन संपन्न;मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले कन्यापूजन

पुण्यात प्रथम पार पडला भव्य दिव्य कन्यापूजन सोहळा : राज्यात प्रथमच असा अद्वितीय सोहळा

पुणे :  नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी ( दि. ११)  करण्यात आले होते. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कन्यापूजन सोहळ्याने उपस्थित भारावून गेले.

          या सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:  मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक पद्धतीने सात मुलींचे पूजन केले.यावेळी सहभागी मुलींचे डोळे पाणावून गेले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मुलींनी व त्यांच्या पालकांनी मोठे कौतुक केले.

Img 20241011 wa00155017687067140315753

यावेळी भाजपा कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला,  प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, कुलदीप सावळेकर, प्रशांत हरसुले, सरचिटणीस अनुराधा एडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, गिरीश खत्री, दीपक पवार, बाळासाहेब टेमकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,अल्पना वर्पे, ॲड. वासंती जाधव, छाया मारणे, ॲड.‌ मिताली सावळेकर, अजय मारणे, प्राची बगाटे, अपर्णा लोणारे, कल्पना पुरंदरे, विद्या टेमकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला.

Img 20240404 wa001528129

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे. यानुसार या कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ कोथरूड भागातील नव्हे तर सर्व पुणे शहरातून या सोहळ्यासाठी मुलींनी व त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.

      यावेळी बोलताना पाटील यांनी, दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे अश्वासन उपस्थित संस्था ना दिले. तसेच १ नोव्हेंबर पासून १ हजार माता भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल अशी नोकरी दिली जाईल असे ही सांगितले. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी असून,लहान मुलींमध्ये ही रूपे दिसत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते.

Img 20240404 wa0012281298841886320058264868

ते पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये