कर्वेनगरवासियांच्या आरोग्य सेवेत महापालिकेचा नवीन दवाखाना : सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन..
कर्वेनगर : कर्वेनगर – वारजे प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीकरीता सुरू करण्यात आलेल्या पुणे महानगर पालिकेच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आरोग्य तपासणी केंद्र, दवाखान्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप महापालिकेचे सर्व आरोग्य अधिकारी, डॉक्टर उपस्थिती होते. माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या पाठपुराव्यातून इंगळेनगर जवळ दत्त दिंगबर कॉलनी येथे हा दवाखाना सुरू करण्यात आला असून भविष्यात या दवाखान्याच्या माध्यमातून तेरा सुविधा मोफत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नागरिकांच्या आरोग्य विषयक सेवेकरीता दवाखाना सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक सचिन दोडके, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष त्रिंबक मोकाशी, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी, माजी कोथरूड युवा अध्यक्ष प्रमोद शिंदे, खडकवासला विधानसभा अर्बन सेल अध्यक्ष मीनल धनवटे, विनोद हनवते, सुरज शिंदे, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका : सुप्रिया सुळे
गेल्या तीन वर्षांपासून पुणे मनपामध्ये सार्वत्रिक निवडणूक न झाल्याने प्रशासक कार्यरत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अडचणींचेही निराकारण करणे दुरापास्त होत आहे. यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास त्वरित दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेत नागरिकांचे लोकशाहीने दिलेले अधिकार अबाधित राखले जातील, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.