कोथरुड

कोथरूड भीम महोत्सव २०२४ च्या अध्यक्षपदी बापू डाकले यांची बहुमताने निवड..

कोथरूडमध्ये भीम महोत्सव २०२४ चे आयोजन..

कोथरूड : कोथरूडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोथरूड भीम महोत्सव  २०२४ च्या अध्यक्षपदी शाहू फुले आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्ते बापू डाकले यांची बहुमताने निवड करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती Dr.Babasaheb Ambedkar Jayanti देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त कोथरूड मधील विविध पक्षांमधील प्रमुख पदाधिकारी, ३० पेक्षा जास्त चळवळीमधील कार्यरत संघटना, संस्थांचे प्रमुख यांनी एकत्र येऊन कोथरूड भीम महोत्सव समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून येत्या १४ एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी भव्य अशा भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Img 20240322 wa00017404573101520546217

या महोत्सवाच्या तयारी करता कोथरूड उपनगरामधील शाहू फुले आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांची बैठक थोरात उद्यान कोथरूड येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. या बैठकीला कोथरूड भागातील आंबेडकरी चळवळी मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक प्रमुखांवर  जबाबदारी सोपवण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी विविध सूचना केल्या. या सर्वांच्या सूचनांची नोंद घेऊन कार्यक्रम पत्रिका ठरविण्यात येणार आहे व त्यानुसार लवकरच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे. 

बैठकीमध्ये कोथरूड महोत्सव २०२४ साठी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्ष – नामदेव ओव्हाळ, कार्याध्यक्ष – बाळासाहेब खंकाळ , दीपक कांबळे, सहकार्याध्यक्ष – राजाभाऊ गायकवाड उमेश कांबळे,  खजिनदार- अमोल जगताप, विजय मोघे, अशोक करांजकर, संघटक – भारत भोसले, कैलास कदम, दयावान बचूटे, उत्सव प्रमुख – बळीराम खळगे, जितेश दामोदरे, दत्ता वाढवेराव, राहुल वाघमारे सेक्रेटरी – दत्ता शेडगे, सारंग गायकवाड, केशव पौळे
उप सेक्रेटरी – समाधान किरतकर्वे, अण्णा लोखंडे, संतोष म्हस्के, सुरेंद्र शिंदे, सहसंघटक – सोमनाथ घोडके, प्रदीप मदळकर, ॲड.मंगेश कदम, सतीश खळगे, नितीन कांबळे सल्लागार – तात्या कसबे, वसंत वाघमारे

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

या बैठकीला सुनील ओहळ, राजेश कांबळे, नितीन कांबळे, समीर कांबळे, पांडुरंग कांबळे, दत्ता वाढवेराव, लक्ष्मण म्हस्के, सुरेंद्र शिंदे, सोमनाथ गोरघे, विजय मोघे, दादा गागडे, विजय भोसले, रामकांत माने,  वसंत वाघमारे, नामदेव पुळवले, अमोल जगताप, नामदेव ओहळ, बाळासाहेब खंकाळ, चंद्रकांत ओहळ, महीपत जोरी, दत्ता शेंडगे, राहुल वाघमारे, अशोक करांजकर, राजाभाऊ गायकवाड, दयावान बचूटे,  भारत भोसले, प्रदीप मदळकर, जितेश दामोदरे, तात्या कसबे, रवी बनसोडे, सारंग गायकवाड, नितीन पायाला, केशव पौळे, बळीराम खळगे, प्रताप म्हस्के, पाटेकर दादा, बाबासाहेब तुरूकमारे,  समाधान किरतकर्वे, अण्णा लोखंडे, कुंडलिक दुपारगुडे, संदीपन पौळे आदी कोथरूड मधील विविध भागातील समाजबांधव उपस्थित होते.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये