पुणे शहर

कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात उषा मंगेशकर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे : संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘लतादीदी…. एक स्मरणीय यात्रा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. भारताच्या महान गायिका लता दीदी ज्यांनी त्यांचा आवाजाने फक्त भारतातच नाही तर जगात आपली वेगळ ओळख निर्माण केली. जगात व संगीतसृष्टीत स्वतःची अशी जागा तयार केली. अशी जागा की कोणी ती जागा कोणीच मिळवु शकणार नाही. अशा स्वरसम्राज्ञी लता दीदींना आदरांजली म्हणून संस्कृती प्रतिष्ठान आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात तिसऱ्या दिवशी लतादीदींची गाणी सादर करीत सर्वांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात आदरणीय उषा मंगेशकर यांनी हजेरी लावली. पुण्यातील मानाच्या गणपतींच्या आशीर्वादाने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते उषा मंगेशकर यांचे स्वागत करण्यात आले‌‌. प्रसिद्ध कीबोर्ड वादक सत्यजित प्रभू व गिटार वादक अमुक दांडेकर यांनी गायकांना साथ दिली. या कार्यक्रमात प्रसिद्ध नामवंत गायिका सावनी रवींद्र, प्रियंका बर्वे, आर्या आंबेकर,गायक सलील कुलकर्णी, ऋषिकेश रानडे यांनी लतादीदींची गाणी गाऊन या सोहळ्याला रंगत आणली. याच कार्यक्रमात सलील कुलकर्णी यांनी उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. उषा मंगेशकर यांनी गप्पा मारताना लता दीदींचे अनेक पैलू उलगडले.

Img 20220422 wa0084

उषा मंगेशकर म्हणाल्या, लतादीदींचा आवाज आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण आम्ही लहानपणी ऐकलेली गाणी आणि लतादीदींनी गायलेली गाणी यात खूप फरक आहे. गाण्यांची ठेवण, शब्द, चाल,ताल या सगळ्या मधील बदल लतादीदीने अगदी सहज तिच्या आवाजात सामावून घेतले. पुढे सांगताना त्या म्हणतात लतादीदींनी एकूण २९ वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. लतादीदी एक गायिका म्हणून उत्तम होत्याच पण त्या व्यक्ती म्हणूनही सर्वगुणसंपन्न होत्या.

      त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे, तरीही त्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय त्यांनी कधीही घेतले नाही. लता दीदी एक व्यक्ती म्हणून अवकाशापेक्षा मोठ्या आहेत. त्या प्रत्यक्षात आपल्या बरोबर नसल्या तरी त्या अजूनही आपल्यातच आहेत आणि कायम राहतील. आजही लतादीदींच्या फोटोवर हार न घालता घरातील सगळे त्यांना विनम्र अभिवादन करतात. त्यांच्या पावलांच्या फोटोला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करतात.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये