पुणे शहर

नवले पुलाजवळ धावत्या ट्रकला भीषण आग, चौघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ धावत्या ट्रकने पेट घेतल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी साडेआठच्या सुमारास घडली. त्यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग आटोक्यात आणली. बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी रात्री आठच्या सुमारास ट्रक निघाला होता. नवले पूल स्वामी नारायण मंदिर परिसरात धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकने पेट घेतल्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रक बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये