कर्वेनगरमधील रस्त्यावर भर दिवसा तरुणाचा खून.. परिसरात खळबळ

कर्वेनगर : कर्वेनगर मधील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गिरिजा शंकर, शारदा निकेतन समोरील रस्त्यावर भरदिवसा एका तरुणाचा वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भर दिवसा कर्वेनगर मधील रस्त्यावर असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. शारदा निकेतन समोरील रस्ता पोलिसांनी बंद केला असून पोलिसांनी तपास सूत्रे हलवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खून झालेला तरुण कोथरुड परिसरात राहणारा असून त्याचे नाव अनिल राजेंद्र जाधव (वय २०)असल्याचे कळत आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे.
कर्वेनगर मधील सोसायटी परिसरात हा प्रकार घडल्याने. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुण दुचाकीवरून शारदा निकेतन येथून जात असताना आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकी अडवून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे.

सलमान खानला सर्पदंश https://www.sinhasannews.com/actor-salman-khan-bitten-by-a-snake-inc



