उद्योग

माझे कामगार माझी जबाबदारी मोहिमेला शिवणे औद्योगिक क्षेत्रात सुरवात

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचा उपक्रम

पुणे : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात माझे कामगार माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात आज शिवणे येथील औद्योगिक क्षेत्र परिसरात करण्यात आल्याची माहिती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष, उद्योजक अभय भोर आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष, उद्योजक संजय भोर यांनी दिली.

फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या बैठकीत माझे कामगार माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याबाबत
निर्णय घेण्यात आला असून अनेक उद्योजकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या कल्पनेचे स्वागत केले  आहे. शासन माझे घर माझी जबाबदारी ही मोहीम राबवत आहे.  परंतु ही मोहीम फक्त घरापर्यंतच सिमीत न राहता कामगारांची ही ते काम करत असलेल्या ठिकाणी तपासणी व्हावी म्हणून माझे कामगार माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे.  शिवणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव परिसरात वीस ते पंचवीस हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये दहा ते पंधरा लाख कामगार काम करत आहेत.  एका ठिकाणी मोठ्या संख्येने काम करत असताना  कराेना विषाणूंचा चा प्रादुर्भाव घरापर्यंत जाऊ शकतो तो रोखण्यासाठी आणि शासनाला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने आपल्या कंपनीमध्ये माझे कामगार माझी जबाबदारी ही संकल्पना राबविल्यास नक्कीच याचा खूप मोठा फायदा संपूर्ण समाजाला होणार आहे.

कामगार कामाच्या ठिकाणी आल्यानंतर तसेच घरी जाताना सुरक्षेची पूर्ण जबाबदारी प्रत्येक उद्योजकाने घेतली पाहिजे. जेणेकरून कामगार वर्गाच्या घरापर्यंत त्याचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत तरच खऱ्या अर्थाने शासनाची माझे घर माझी जबाबदारी ही शासनाने घेतलेली मोहीम यशस्वी होऊ शकेल. असे अभय भोर आणि संजय भोर यांनी सांगितले.

ज्या उद्योगांमधील कामगारांची तपासणी करावयाची असेल त्यासाठी डॉ. अजिंक्य तापकीर व माऊली हॉस्पिटलची सुसज्ज अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचे पथक मागणीनुसार कंपन्यांमध्ये जाऊन पूर्ण तपासणी करतील. ज्या कंपन्यांमधील कामगारांच्या तपासण्या करावयाचे आहेत त्यांनी फोरमचे अभय भोर आणि संजय भोर  यांच्या संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Tags
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close