पुण्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद संपन्न ; रस्ता सुरक्षा संदर्भात चर्चा

पुणे : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यात आयोजन करण्यात आले होते. उत्साहात पार पडलेल्या या परिषदेत उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षेबाबत काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. येरवडा येथील क्रिएटीसिटी मॉल अर्बन बँक्वेट हॉल येथे ही परिषद पार पडली.
या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्य सचिव महेश झगडे व परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य भरत कळसकर यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कार्यकारी समिती अध्यक्ष ऑल इंडिया मोटर काँग्रेस नवी दिल्ली बल मलकित सिंग, अध्यक्ष ऑल इंडिया मोटार काँग्रेस नवी दिल्ली अमृतलाल मदन, पीपल ट्रस्ट इंडिया च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा सिंग, उपस्थित होते. यावेळी ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारची राष्ट्रीय परिषद घेण्याची संकल्पना पहिल्यांदा राबवण्यात आली असल्याने आयोजकांचे कौतुक करण्यात आले.










सदर राष्ट्रीय परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रस्ते सुरक्षेचे काम करणाऱ्या मान्यवरांचा रस्ता सुरक्षा संदर्भात विशेष योगदान दिल्याबद्दल विशेष सन्मान करत गौरवण्यात आले. पीपल ट्रस्ट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा सिंग, कार्यकारी समिती अध्यक्ष ऑल इंडिया मोटर काँग्रेस नवी दिल्ली बल मलकित सिंग, अध्यक्ष ऑल इंडिया मोटार काँग्रेस नवी दिल्ली अमृतलाल मदन , जागतिक रस्ता सुरक्षा परिषद दोन वेळा पारितोषिक विजेते हरप्रीत सिंग सिंग, कॉर्पोरेट रोड सेफ्टी प्रमुख अदानी ग्रुप मुंबई चे पंकज सिंग, विशाखापट्टणम येथे दिव्यांग लोकांसाठी काम करणारे दिलीप पात्ररो ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, सेक्रेटरी बॉम्बे गुड्स ओनर्स असोसिएशन ट्रान्सपोर्ट सुरेश वामन खोसला, १०१ वर्षांपासून ड्रायव्हिंग स्कूल इंडस्ट्रीमध्ये योगदान असलेले तसेच व्यवस्थापन व वाहन चालक यांच्या सुख सोयी बाबत उल्लेखनीय कार्य करणारे आपटे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विलास आपटे, अक्षय मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व पुणे मुंबई महामार्गावर रस्ता सुरक्षेसाठी काम करणारे तन्मय पेंडसे, महाराष्ट्र परिवहन विभागाच्या सर्विसेस ऑनलाइन होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल तेजसिंग बिंद्रा यांना गौरवण्यात आले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेमध्ये वरील सर्व मान्यवरांनी रस्ता सुरक्षा विषयक मौल्यवान मार्गदर्शन केले. असोसिएशनच्या कार्याबद्दल व आत्तापर्यंतच्या उपक्रमाबद्दल मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सुनिता चौहान यांनी केले. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य वेबसाईटबाबत व संकल्पनेबाबत असोसिएशनचे राज्य प्रवक्ता विवेक खाडे यांनी माहिती दिली. संकल्पना प्रशांत पांडे मुंबई यांची होती.



कार्यक्रमाला 250 सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व विविध क्षेत्रातील अधिकारी परिवहन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत काकडे यांनी व आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव शिवाजी काकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता चौहान, राजेश कोटगिरे, महेश चव्हाण, प्रवीण महाकाळ, सहदेव वंजारे, महेंद्र सोनवणे, सुनील मोरे सोमनाथ गायकवाड, अनुज शिंदे, अनिल अडागळे, आशिष पवार, गणेश बाजारे, प्रशांत बिराजदार, दत्ता वाळुंज, बाळासाहेब धारमाळकर, राजेश माळवतकर, अर्चना इरकल, राधिका पोटे, यांनी प्रयत्न केले.



