कोथरुड

कोथरुडमधील नवदुर्गा महिलांचा नगरसेविका हर्षाली माथवड यांच्याकडून सन्मान..

कोथरुड : pune city, Kothrud गेल्या दोन वर्षापासून आपण सगळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला सामोरे जात आहोत. या रोगराईच्या संकट काळात आरोग्य, शैक्षणिक व पोलीस क्षेत्रातील महिलांनी न डगमगता आपली कामगिरी बजावली आहे, त्यामुळे नवरात्रीचे औचित्य साधत नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या वतीने कोथरुड मधील या क्षेत्रातील महिलांना नवदुर्गा सन्मान’ने सन्मानित करण्यात आले.

कोरोनाच्या परिस्थितीत प्रभाग १२ मधील पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य दूत महिलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून काम केले. अशा सर्व ‘आरोग्य दूत महिला ’ यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून, सर्व सेविकांचा ‘नव दुर्गा सन्मान’ने हर्षाली माथवड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

याच संकट काळात कोथरुड मधील श्री. छत्रपती संभाजी विद्यालय, विद्यानिकेतन विद्यालय व अण्णा साहेब विद्यालयातील शिक्षिका ऑनलाईन शाळेबरोबरच घरोघरी जाऊन कोविड रुग्णाचा सर्व्हे करणे, कोविड रुग्णाची काळजी घेणे तसेच लसीकरण जनजागृती करणे असे काम करत होत्या. या कोरोना संकट काळात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सरस्वती स्वरूप दुर्गाच आहेत. त्यामुळे या दुर्गांचा ‘कृतज्ञता प्रमाणपत्र’ देऊन  सन्मान केला गेला.

कोरोना काळातून जात असताना पोलीस प्रशासनाने बजावलेली भूमिका अतिशय महत्वाची होती. त्यांच्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत झाली. या कठीण काळात महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस खात्यातील महिलाही आघाडीवर होत्या. त्यामुळे कोथरुड पोलीस स्टेशन मधील महिला पोलिसांनाही नवदुर्गा सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्यदूत महिलांचा सन्मान म्हणजे ‘आरोग्य लक्ष्मीची’पूजा आहे. तर शाळेतील शिक्षिका या सरस्वती स्वरूप दुर्गा तर महिला पोलिस या सुरक्षा स्वरूप दुर्गा आहेत. त्यांचे कार्य अतुलनीय व प्रशंसनीय असेच आहे त्यामुळे या नवदुर्गांचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे हर्षाली माथवड यांनी म्हंटले आहे.

Screenshot 2021 10 14 09 26 41 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये