महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

गेले अनेक दिवस रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांची निवड करण्यात आली आहे. महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी रिक्त असल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत होती.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात रूपाली चाकणकर यांनी कायमच आवाज उठवला आहे. महिला सुरक्षेविषयी त्या कायम बोलत असतात. त्यामुळेच आक्रमक असणाऱ्या
चाकणकर यांची राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी निवड झाली असल्याचे बोलले जात आहेत.

विरोधकांना सडेतोड व मुद्देसूद उत्तर देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्या कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर महिलांचे संघटन उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जात आहे.

Screenshot 2021 10 14 09 26 41 50
Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये