पुणे शहर

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक आणि सुटका ; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पडली महागात…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(NCP city president Prashant Jagtap arrested and released; The crowd gathered at the NCP’s program was expensive)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गर्दी जमवल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द अजित पवारांनीच दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पोलिसांनी जामीन मंजूर करत त्यांची सुटकाही केली.

IMG 20210522 WA0207

प्रशांत जगतापांकडून दिलगिरी व्यक्त

पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये