पुणे शहर

३० ते ४५ वर्षे व्यक्तींना लस देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय एकच केंद्र ; लसीकरण केंद्र वाढवण्याची दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे :  सध्या पुणे शहरामध्ये १५ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत लसीकरण सुरु आहे. ४५ वरील वय असणाऱ्यांना लसीकरण सुरू असून आता मनपाच्या वतीने ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. मात्र ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया निहाय एकच केंद्र सुरु केलेले आहे व या एकाच केंद्रावर जास्त गर्दी होत आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीपासून वंचित रहावे लागत असल्याने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. ward office wise single center for vaccination of persons aged 30 to 45 years;  Deepali Dhumal demands expansion of vaccination center

याबाबतचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे. नियमानुसार सर्वच वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे मात्र चुकीच्या नियोजनामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  निर्दशनानुसार ४५ वयोगटावरील नागरिकांचा लसीचा पहिला डोस बऱ्यापैकी झालेला आहे. नियमानुसार ८४ दिवस झाल्याशिवाय दुसरा डोस घेता येत नाही.

IMG 20210522 WA0203

आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक लसीकरण केंद्रावर ३० ते ४०% ह्या लस शिल्लक राहत आहेत. याची दोन कारणे आहे, एकतर ४५ वयोगटावरील लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली व ८४ दिवस न झाल्याने दुसरा डोस त्या व्यक्तिला घेता येत नाही. यामुळे लसीचे डोस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे  शिल्लक राहिलेल्या लसी ह्या ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना देण्याची व्यवस्था करावी जेणेकरुन ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांना फायदा होईल व या वयोगटातील लसीकरण ही जास्त प्रमाणात होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये