पुणे शहर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पर्यावरण आघाडीच्या वतीने वृक्षारोपण…

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पर्यावरण आघाडीच्या वतीने खडकवासला जवळील गोऱ्हे (खुर्द) येथे ग्रीन थंब या प्रोजेक्ट मध्ये 100 पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडें लावून निसर्गाशी एक वेगळे नाते जोडले. पाच वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षांच्या जेष्ठ सभासदांनी या  वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. Tree planting on behalf of All India Brahmin Federation’s Environmental Front.

मुलांना झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, स्वदेशी झाडांचे नैसर्गिक दृष्ट्या महत्व याची माहिती तज्ञांनी यावेळी दिली. प्रत्येक मुलानं, पालकांनी वृक्षारोपण करुन या उपक्रमाचा आनंद लुटला.

उपक्रमाच्या नियोजनात गिरीश कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा राहिला, राहुल करमरकर, लक्ष्मीकांत धडफळे यांनी पर्यावरण व त्यांचे संगोपन याचे महत्व सांगितले. दयाकर दाबके, कुलकर्णी आजी यांनी संस्कृत श्लोक पठण केले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र व मुलांना महासंघाच्या वतीने गिफ्ट देण्यात आले.

IMG 20210522 WA0203

कोरोनाचे सर्व नियम पाळून झालेल्या आजच्या या अनोख्या उपक्रमाला लक्ष्मीकांत धडफळे, गिरीश कुलकर्णी, कमलेश जोशी, सुयोग नाईक, राहुल जोशी, उपेंद्र सोनारीकर, अजित खरे, विकास अभ्यंकर, राहुल फाटक, दीपिका बापट, सानिका खरे, सरस्वती जोशी,स्मिता इनामदार , जयश्री घाटे, शिल्पा वैद्य, दीपा फाटक, उदय मांडके, उपेंद्र गाडगीळ हे सर्व पदाधिकारी आपल्या संपूर्ण कुटुंबासहित उपास्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.

पुस्तकातील लिखित ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचा आनंद आज मुलांनी, पालकांनी घेतला व निसर्ग कायम जपण्याचे अलिखित वचन यानिमित्ताने देण्यात आले. आगामी काळात महासंघाच्या वतीने e-waste, गच्चीवरील बाग, स्वच्छता अभियान, कचरा निर्मूलन असे अनेक उपक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचे मंदार रेडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये