पुणे शहर

शिवसेना कोथरूड विभागाच्यावतीने “धर्मवीर” चित्रपटाच्या खास शो चे आयोजन

पुणे : शिवसेना कोथरुड विभागाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर या चित्रपटाच्या मोफत प्रयोगाचे आयोजन सिटी प्राईड थिएटर कोथरुड येथे करण्यात आले. कोथरुडमधील अनेक ज्येष्ठ नागरीक,महिला भगिनी व तरुणांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पुजन कोथरुडचे प्रथम शाखाप्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक किसनराव मोकाटे,साहेबराव भेलके,हरिभाऊ कुंबरे,बाळासाहेब मोकाटे यांच्या हस्ते करुन प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला.

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उपस्थित प्रेक्षकांना संबोधित करताना सांगितले की आदर्श कार्यकर्ता कसा असतो व तो कुठल्याही पद किंवा सत्तेशिवाय समाजकार्य कसे करु शकतो हे फक्त आनंद दिघे साहेबांचा आदर्श  घेऊनच व त्यांचा हा जीवनपट पाहिल्यावरच कळु शकेल.

यावेळी प्रशांत बधे,गजानन थरकुडे,प्रितम उपलप,किरण साळी,नितीन शिंदे,नंदु घाटे,राजु कुलकर्णी,शिवाजी गाढवे,भारत सुतार,उमेश भेलके,किशोर सोनार,संजय खोंडके,दिपक चोरघे,कांता बराटे,माणिकशेठ दुधाणे,अमित भगत,छाया भोसले,प्रज्ञा लोणकर,भारती भोपळे,सविता वायकर,किरण पवार, व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक ॲड.योगेश मोकाटे यांनी मानले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये