कोथरुड
कर्वेनगरमधील काकडे सिटीसमोर चैन स्नॅचिंगचा प्रकार

कर्वेनगर : pune city, karvenagar येथील काकडे सिटी समोरील गालींदे पथ रस्त्यावर रस्त्याने पायी चाललेल्या पती पत्नीला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अडवून पत्नीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याचा प्रकार बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडला आहे.
या घटनेनंतर संबधित व्यक्तींकडून वारजे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आली असून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.




