पुणे शहर

सुप्रिया सुळे यांचा फोटो एडीट करून व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : pune city खासदार सुप्रिया सुळे यांचा खोटा फोटो एडीट करून तो व्हायरल करणाऱ्या शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे व भा.ज.पा. कार्यकर्ता अजय नागरे यांच्यावर  कडक कारवाईची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने करण्यात आली आहे.

शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे व भा.ज.पा. कार्यकर्ता अजय नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे यांनी पुणे सायबर क्राईमकडे केली आहे. यावेळी कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, माजी नगरसेवक लक्ष्मण आराडे, ॲड.स्वप्निल जोशी, भूषण बधे, स्वप्निल थोरावे, केतन ओरसे, कुलदीप शर्मा, सेफ सय्यद, राज कोळी उपस्थित होते.

Img 20220910 wa0003

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्याच्या
खुर्चीवर बसलेला खोटा फोटो एडीट करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे
नागरीकांमध्ये तसेच पक्षातील कार्यकत्यांमध्ये नाराजगी वाढली असून तेढ निर्माण करण्याचे घाणेरडे काम शितल म्हात्रे व अजय नागरे यांनी केलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे कोणीही कुठल्याही प्रकारचा फोटो एडीट करून कार्यकत्यांमध्ये व नागरीकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे काम करणार नाही. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटण्यात आले आहे. या निवेदनासोबत एडीट केलेले फोटो व ओरीजनल फोटो हे  जोडण्यात आले  आहेत.

शिंदे फडणवीस सरकारचे अपयश लपवण्यासाठी असे खालच्या थराचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केला आहे.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये