पुण्यातील लॉकडाऊन बाबतीत हा झाला महत्वाचा निर्णय

पुणे : पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(This was an important decision in the case of lockdown in Pune)
पुणे शहरातील वाढलेल्या कोरोना रूग्ण संख्येमुळे शहरात शनिवार आणि रविवार या दिवशी करण्यात आलेल्या कडक लॉक डाउन मध्ये आता थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. आता अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 28, 2021
पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल.



