कोथरुड

कोथरूड मैत्री व्यासपीठ म्हणजे मैत्रीचा अतूट धागा : मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळ यांचा कोथरूड मैत्री व्यासपीठाच्या वतीने सन्मान..

कोथरूड : कोथरूड मधील सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मैत्रीचा अतूट धागा म्हणजे कोथरूड मैत्री व्यासपीठ आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून माझा सन्मान म्हणजे घरच्या लोकांनी केलेला सन्मान आहे. घरच्या लोकांनी केलेल्या सन्मानामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल अशा भावना माजी महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर यांनी व्यक्त केला.

भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मोहोळ यांचा मैत्री व्यासपीठाच्या माध्यमातून आज सन्मान करण्यात आला. मोहोळ म्हणाले, पक्षीय वैचारिक मत भेद असतात पण सर्वजण या व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र येत खेळी मेळीच्या वातावरणात संवाद साधतात ही एक चांगली आणि आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. कोथरुड मैत्री व्यासपीठाच्या प्रत्येक उपक्रमाला माझी साथ असणार आहे. कोथरुड मध्ये महाराष्ट्र केसरी सारख्या मोठ्या कुस्ती स्पर्धेचे कोथरुड मध्ये आयोजन करण्यात येत असल्याने या प्रसंगी मोहोळ यांचे अभिनंदन करण्यात आले.

Img 20220910 wa0003

महिन्यातून एकदा एकत्र येत सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी विविध विषयांवर चर्चा करत असतात. यावेळी अजय मारणे, नितीन शिंदे, संदीप मोकाटे, गणेश वरपे, गणेश शिंदे, विजय डाकले, विनोद मोहिते, सचिन मोकाटे, नाना कुंबरे, गोविंद थरकुडे, विशाल भेलके, रमेश उभे, साधू धुमाळ, किरण उभे, श्रीपाद चिकणे, दीपक दुधाने, संतोष अमराळे, बापू चव्हाण, सचिन विप्र, संदीप मोरे, नंदकुमार गोसावी, नवनाथ खिलारे तसेच पत्रकार अमोल साबळे, विनायक बेदरकर, जितेंद्र मैड, माऊली म्हेत्रे आदी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन संदीप मोकाटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये