भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य पदी निलेश म्हस्कुले यांची निवड

पुणे : pune city भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य पदी निलेश यशवंत म्हस्कुले यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
भाजप पुणे शहरध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हस्कुले यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी सरचिटणीस भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश, माजी नगरसेवक सुशील मेंगडे उपस्थित होते. निलेश म्हस्कुले अनेक वर्ष सामाजिक कामात आहेत. त्यांचा जनसंपर्क व मित्र परिवरही मोठा आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
पक्षाने माझी निवड केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप नेत्यांचे आभार मानतो. पक्षाने दिलेल्या जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे म्हस्कुले यांनी निवडीनंतर सांगितले.










