पुणे शहर

चांदणी चौकातील काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नितीन गडकरींचे निर्देश ; आज केली पाहणी

पुणे : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराची पाहणी केली. वाहतूकीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता चांदणी चौक परिसरातील काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चांदणी चौकात उभारण्यात येत असलेल्या बहुमजली उड्डाण पुलाच्या कमामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा या ठिकाणी नागरिकांनी अडवून आपली गाऱ्हाणी मांडली होती. त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर स्वतः शिंदे यांनी ही या चौकाची पाहणी करून कामाची माहिती करून घेतली होती.

आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथील कामाची पाहणी करून पुढील नियोजनाची माहिती घेतली. चांदणी चौकातील महामार्गावरील पाडण्यात येणार जुना पूल, सुरू करण्यात येणाऱ्या नवीन लेन याची माहिती घेताना जून 2023 पर्यंत चांदणी चौकातील काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये