MBA प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत

मुंबई : SVKM च्या NMIMS स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी NMAT प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ ही शेवटची तारीख आहे. एमबीए प्रवेशासाठी घेण्यासाठी NMAT प्रवेश परीक्षा पास करणे आवश्यक आहे. NMIMS MBA अभ्यासक्रमासाठी मुंबई, शिरपूर, बंगरुळू, हैदराबाद, इंदौर, नवी मुंबई, धुळे व चंदिगड या सर्व कॅम्पसमध्ये मिळून MBAच्या १८०० जागा आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी पात्रता :
NMIMS MBA ला प्रवेश घेण्यासाठी NMAT प्रवेश परीक्षेत स्कोअर करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील किमान ५० टक्के गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.



असा करा प्रवेश परीक्षा अर्ज :
● स्टेप १ – nmat.nmims.edu या संकेतस्थळावर जाऊन GMAC ID व password तयार करा.
● स्टेप २ – NMIMS रजीस्ट्रेशन फॉर्म पूर्ण भरून परीक्षा शुल्क अदा करायचे आहे.



NMIMS MBAच्या जागांची संख्या पुढीलप्रमाणे :– एमबीए (फायनान्स/मार्केटिंग/ऑपरेशन्स आणि डिसीजन सायन्सेस) – ६००, एमबीए मान संसाधन – १२०, एमबीए – व्यवसाय विश्लेषण – १२०, एबीए (डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन) – ६० , एमबीए फार्मास्युटीकल मॅनेजमेंट – १२०, एमबीए बंगळुरू – २४०, एमबीए जडचर्ला (हैद्राबाद) – २४०, एमबीए नवी मुंबई – १८०, एमबीए इंदौर -१२०



एनएमआयएमएस एसबीएम विषयी थोडक्यात:
एसव्हीकेएमच्या एनएमआयएमसचे एसबीएम, डिम्ड टू बी युनिवर्सिटी, हे भारतातील अग्रगण्य बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. जगप्रसिद्ध प्राध्यापक आणि उत्कृष्ट प्लेसमेंटचा वारसा जपला आहे. ४१ वर्षांचा वारसा लाभलेले हे बीजनेस स्कूल त्याच्या ट्रेलब्लेझिंगसाठी ओळखले जाते. १९९८ सालापासून देशातील टॉप १० बीजनेस स्कूलमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे. एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएसला MHRD/UGC द्वारे श्रेणी -१ डीम्ड युनिवर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. आणि एनएमआयएमएस मुंबई कॅम्पस 3.59च्या CGPA सह NAAC मान्यताप्राप्त आहे.


