पुणे शहर

कमला नेहरू मधील ऑक्सिजन बेड सुरू करा : पृथ्वीराज सुतार

पुणे : कमला नेहरू हॉस्पिटल ४०० बेडचे आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी ऑक्सीजन व्यवस्था असलेले १०० बेड तयार आहेत, मात्र ते सुरू करण्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तरी हे बेड कोरोना रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सुतार यांनी म्हंटले आहे की, पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून आजपर्यंत एक लाखाच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झालेले आहेत. २५०० वर मृत्यू झालेले आहेत. आणि साधारण दररोज ८०० ते २००० लोक पॉझिटिव्ह येत आहेत.  आता हे कोरोनाचे संकट गंभीर होत चालले असून या संकटाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

सध्या रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांचा उपचाराविना मृत्यू होत आहे. याबाबत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी महापालिकेकडे केलेली आहे. 

कमला नेहरू रुग्णालयात ऑक्सीजन व्यवस्था असलेले बेड तयार आहेत. तरी ते या कोरोना रुग्णांसाठी चालू करावे. यासाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असून प्रशासनाने अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे दिसून येत आहे.  या गोष्टीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

भविष्यामध्ये बेड न मिळाल्यामुळे पुणेकरांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी त्वरित कमला नेहरू रुग्णालय येथे तयार असलेले १०० ऑक्सिजनचे बेड त्वरित सुरू करावेत. आठ दिवसांमध्ये बेड सुरू केले नाही तर बेड अभावी होणाऱ्या मृत्यूंची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची गांभीर्याने दखल घ्यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये