१०० तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात तपासणी, औषध उपचार आणि शस्त्रक्रिया ही मोफत : कोथरूडमध्ये पार पडले मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर..

निलेश कोंढाळकर यांच्या वतीने संयोजन..
कोथरूड : संस्कृती प्रतिष्ठान व श्री बालाजी फाउंडेशन च्या वतीने कोथरूडमध्ये विनामूल्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५०० रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेत विविध आजारांवर तपासणी करत औषध उपचार घेतले. यातील आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

भाजप पुणे शहर चिटणीस निलेश कोंढाळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
१०० तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. प्रत्येक आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र तपासणी विभाग करण्यात आला होता. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची कोणतीही गैरसोय न होता नियोजनबध्द पद्धतीने नोंदणी करून त्यांच्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी आयुष्यमान योजने अंतर्गत कार्ड वाटप करण्यात आले.



या शिबिरात नेत्र तपासणी व चष्मे वाटप, अस्थीव्योंगोपचार, मेंदुरोग, मूत्ररोग, कान नाक घसा तपासणी, ग्रंथींचे विकार, त्वचा व गुप्त रोग, हृदयरोग, जनरल सर्जरी, स्त्री रोग, दंत रोग, श्वसन विकार व क्षयरोग, बालरोग, मानसिक आरोग्य, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर अशा विविध आजारांवर तपासण्या करण्यात आल्या. या मध्ये आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
या प्रसंगी माजी नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, गणेश वरपे, डॉ संदीप बुटाला, दुष्यंत मोहोळ, नितीन शिंदे, प्रकाश कोंढाळकर, अंबादास अष्टेकर, लहू चौधरी, वैभव मुरकुटे, निलेश सोनवणे, अमित तोरडमल, नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.








