कोथरुड

कोथरूडमध्ये नायलॉन मांजाची दुकानांमध्ये जाऊन शोध मोहीम.. चार दुकानदारांवर कारवाई करत दंड वसूल..

कोथरूड : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे गेली काही वर्षात तरूण दुचाकी स्वारांना व काही पशु पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोथरूड परिसरातही अशा अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेने भरारी पथकांच्या माध्यमातून मांजा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. दुकाना दुकानांमध्ये जाऊन शोध घेतला जात असून असा मांजा सापडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “दमदार भरारी पथकाच्या मार्फत प्रभाग क्रमांक कोथरूड परिसर व बावधन गावामध्ये मांज्या शोध मोहीम घेण्यात आली. या मोहिमेद्वारे जय भवानी व्हरायटीज एनडीए पाषाण रोड याठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४ दुकानदारावर  प्रत्येकी ५०००/- रुपये रोख स्वरूपात असे एकूण २०,०००/- ( वीस हजार रुपये )दंडात्मक कारवाई करून शुल्क वसूल करण्यात आले.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

या माहिमेद्वारे पतंग व मांजा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना नायलॉन मांजा किती घातक आहे याविषयी माहिती देण्यात आली, शिवाय नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या  व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नागारिकांनी नोंद् घ्यावी असे आवाहन करण्यात आले. 

वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी एम. आय. टी. महाविद्यालयाच्या  प्रांगणात ” स्वरा झंकार” या संगीत रजनी कार्यक्रमात दोन हजार तरूण नागरिकांना स्वच्छता व मांजा वापरू नका म्हणून शपथ देण्यात आली. तसेच “स्वच्छ भारत अभियान व सर्वेक्षण मिशन २०२५” च्या अनुषंगाने स्वच्छता अभियानात नागरिकांचा १००% सहभाग वाढवा व पुणे शहराला एक नंबर वर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

शिवाय कोथरूड परिसरातील प्रत्येक व्यवसायिक व नागरिकांना माईकद्वारे ” पतंग महोत्सव साजरा करत असताना जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नका, मानवी व पशुपक्षांचे जीव धोक्यात घालू नका, साध्या दोऱ्याचा वापर करा आणि आपल्या प्राणांचे रक्षण करा असे आवाहन करण्यात आले.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

मांजा शोध मोहिम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका साहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, सचिन लोहकरे, करण कुंभार, जया सांगडे, रूपाली शेडगे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, सुरज पवार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, संतोष ताटकर मोकादम वैजीनाथ गायकवाड, राम गायकवाड, आण्णा ढावरे, गजानन कांबळे, अशोक कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये