पुण्यातील सदावर्ते राम मंदिरातील श्री राम, माता सीता, लक्ष्मण मूर्ती सुमारे १५०० वर्ष जुन्या आहेत. राम नवमी निमित्त खास छायाचित्रे
पुणे : ” राम नवमी ” निमित्त श्री भिकारदास मारुती मंदिर समोरील ७५ वर्ष जुने मंदिर म्हणजे” सदावर्ते राम मंदिर ” बाजीराव रोड, पुणे, येथील श्री राम, माता सीता, लक्ष्मण, ची मूर्ती सुमारे १५०० वर्ष जुनी आहेत. रामनवमी निमित्त सर्व मूर्ती रंगबिरंगी वस्त्रांनी व सोन्याचे आभूषणाने शृंगार करण्यात आले. राम नवमी निमित्त खास छायाचित्रे छायाचित्रकार सुशील राठोड यांनी काढली आहेत.
त्या काळातील ” राम सेतू ” तयार करताना वापरले गेलेले दगडांपैकी एक दगड मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. रामेश्वर येथील ” धनुस्यकोडी ” येथून त्यांच्या पूर्वजांना प्राप्त झाले होते. श्रीमती शोभा सदावर्ते व सौ. नीलिमा सदावर्ते या मंदिराची देखरेख करीत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्व मंदिरे शासनाच्या आदेश नुसार बंद ठेवण्यात आले आहेत, पण मंदिराची देखरेख करणारे फक्त मंदिरात प्रवेश करत आहेत. हे मंदिर बाजीराव रोड वरील श्री. भिकारदास मारुती मंदिर प्रांगणात स्थापन झालेले ७५ वर्ष जुने मंदिर आहे.






