महाराष्ट्र

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त १५ व १६ मे ला ऑनलाईन  कृषी पर्यटन परिसंवाद ; तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार..       

पुणे : मागील १३ वर्षापासून महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था (UNWTO) यांच्या मान्यतेने १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करीत आहे.  यंदाच्या वर्षी जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता व रविवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन कृषी पर्यटन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली आहे. Online agri-tourism seminar on 15th and 16th May on the occasion of World Agri-Tourism Day

कृषी पर्यटन हेच शाश्वत पर्यटन, कृषी पर्यटन पूरक प्रक्रिया उद्योग, राज्याच्या कृषी पर्यटनाची वाटचाल या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादात मार्टच्या संस्थापक  अध्यक्षा व मार्गदर्शक सुनेत्रा पवार , कोकणातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर,आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे संचालक शशिकांत जाधव, पर्यटन तज्ञ रवींद्र वायाळ हे मार्गदर्शन करणार आहेत.

IMG 20210430 WA0001

नव्याने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे शेतकरी, पर्यटनातील विद्यार्थी, अभ्यासक या परिसंवादांमध्ये सहभागी होऊ शकतील अशी माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली आहे.

झूम ॲप द्वारे खालील लिंक ने मिटिंग मध्ये सहभागी होऊ शकता येणार आहे.

Topic: Zoom Meeting
Time: May 15, 2021 04:30 PM India

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86990030816?pwd=S1p3QlFwUnJQRlVtN2NWdTkrTndpUT09

Meeting ID: 869 9003 0816
Passcode: 121212

Time: May 16, 2021 10:30 AM India

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85283055785?pwd=c2pOVmR0VDhYaEdtbUlqT3ZRRzd4Zz09

Meeting ID: 852 8305 5785
Passcode: 121212

IMG 20210507 WA0009

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये