पुण्यात लसीकरण केंद्रांवर ऊद्या केवळ Covaxin ची लसच उपलब्ध ; हि १५ लसीकरण केंद्रच सुरू राहणार…

पुणे : पुणे शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या एकूण १५ केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्र कोवॅक्सिनचे असतील. १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल. सर्व केंद्रांवरील लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेल. पहिला डोस दिला जाणार नाही.अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(Only Covaxin vaccine will be available at vaccination centers in Pune tomorrow; These 15 vaccination centers will continue)
पुणे शहरात कोविशिल्ड लसीचा साठा न आल्याने ऊद्या केवळ Covaxin लस च उपलब्ध असणार आहे. यातच Covaxin लसीचे केवळ १५०० डोस उपलब्ध असल्याने फक्त ४५ वर्षांवरील दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना केवळ १५ केंद्रांवर ही लस उपलब्ध होणार आहे. अशी माहिती हि मोहोळ यांनी दिली.
शनिवार, दि. १५ मे, २०२१ चे पुण्यातील कोरोना लसीकरण नियोजन




