पुणे शहर

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; मोठा दारुसाठा जप्त करून नष्ट..

पुणे : हवेली तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठा अवैध दारु साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरातील मौजे शिंदवणे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. State Excise Department’s major action in Pune;  Large stockpile of liquor confiscated and destroyed.

या कारवाईत  राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती, विक्री केंद्रावर अचानकपणे
धडक कारवाई करून एकुण ०४ गुन्हे नोंदविले आहेत. सदर कारवाईमध्ये ११,६०० लिटर उग्र वासाचे रसायन, ३५० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण रूपये २,५९,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला.

Img 20220218 wa0239

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात
आली. निरीक्षक तानाजी बी. शिंदे, रघुनाथ डी. भोसले दुय्यम निरीक्षक, प्रशांत एस. धाईजे,  दुय्यम निरीक्षक यांसह सदर कारवाईत सर्वश्री जवान नवनाथ पडवळ, सचिन मांडेकर, अभिजित सिसोलेकर, बी. आर. सावंत, किशन पावडे व महिला जवान मनिषा भोसले यांनी
सहभाग घेतला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये