महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात 20 जुलैला सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण  ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला… एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.  11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याचिकांची सुनावणी होणार आहे.  रमण्णा यांच्याशिवाय न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये