पुणे शहर

पुणे महापालिकेने अन्यायकारक टॅक्स कमी करावा अन्यथा ; सुभाष नाणेकर यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शिवणे उत्तमनगर कोंढवे-धावडे, कोपरे गावांचा प्रश्न

पुणे : महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या शिवणे उत्तमनगर कोंढवे-धावडे, कोपरे या गावांना लावण्यात आलेला अन्यायकारक टॅक्स तातडीने कमी करण्यात यावा अन्यथा आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा भाजप सदस्य व माजी सरपंच सुभाष नाणेकर यांनी दिला आहे.

आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुभाष नाणेकर, माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गणेश वांजळे, आरपीआय चे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवणे,उत्तमनगर,कोंढवे-धावडे, कोपरे या गावांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या अन्याय कारकरक टॅक्स कमी करावा, उत्तमनगर पुनर्वसन असून तेथील प्लॉट धारकांचा टॅक्स कमी व्हावा, कॅनॉल रस्त्याला मुख्य खात्याच्या बजेट मधून 5 कोटीची तरतूद करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Fb img 1647413711531 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये