पुणे शहर

अजितदादांच्या जयंतीनिमित्त कोथरूडमध्ये आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन ; सेवाभावाचा दिला गेला संदेश

कोथरूड : महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

Img 20260222 wa00063491038201882637992

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. रक्तदानासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करत समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागी होत इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले.

यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर म्हणाले, “रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य आहे. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून मोठ्या संख्येने रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार.” अजित दादांनी आपले आयुष्य समाजासाठी वाहिले होते. समाजाच्या प्रगतीसाठी राज्याच्या विकासासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते. आज त्यांची कमी सर्वांनाच जाणवत आहे. आज त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा कार्यपट डोळ्यासमोर उभा राहतो.

शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांचा सेवाभाव आणि सामाजिक जाणीव ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही मानकर यांनी यावेळी नमूद केले.

वाढत्या रक्ताच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर अशा रक्तदान शिबिरांमुळे रक्तपेढ्यांना मोठी मदत होत असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. अजित दादांच्या जयंती निमित्त आयोजित या रक्तदान शिबिराने सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत कोथरूडमधील नागरिकांमध्ये सेवाभावाचा संदेश दिला गेला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये