पुणे शहर

बावधनमधील कचरा मोफत उचला. स्वच्छ संस्थेकडून नको. अन्यथा आंदोलनाचा सरपंच दगडे पाटील यांचा इशारा

पुणे :  पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट बावधन बु. येथे ग्रामपंचायत असताना संपूर्ण गावचा कचरा मोफत उचलला जात होता बावधन बु. हे गाव आता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिका स्वच्छ कंपनीला कचरा उचलण्यासाठी नागरीकांना बळजबरी करत आहेत आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध असल्याचे सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी सांगीतले. तरी पूर्वी प्रमाणेच मोफत कचरा गोळा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

दगडे पाटील म्हणाल्या, सर्व नागरिक टॅक्स भरत असताना त्यांच्याकडून सुविधाचे पैसे घेणे कितपत योग्य आहे आणि स्वच्छ कंपनीला आमचा पुर्णपणे विरोध आहे. सध्या ग्रामस्थाची दिशा भूल करण्याचे काम शेजारील लोक प्रतिनिधी करत आहे . पुणे महापालिका सदस्य हि ग्रामपंचायत कचरा संकलन व्यवस्था बाधित करत आहेत . पुणे महापालिकेच्या वतीने हा बावधनवासियांना नाहक त्रास आहे. ज्यांना कुणाला स्वच्छ कंपनी मार्फत कचरा उचलायचा आहे त्यांनी त्यांच्याच भागात नेऊन उचलावा.

तरी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जसा ग्रामपंचायत मार्फत पहिला जसा मोफत कचरा उचलला जात होता तसाच आता पण पुणे म.न.पा. मार्फत मोफत कचराउचलला जावा. बावधन ग्रामपंचायतीत ५ टेम्पो असून वर्षानुवर्षे कचरा विघटन केले जात होते. यासाठी स्वतंत्र यंत्रणा (कर्मचाऱ्या सहित) असून ती पूर्ववत सुरु करण्यात यावी .

Img 20210727 wa0218

स्वच्छ संस्थेचा कचरा संकलन करण्यास जो आपला निधी व्यय होत आहे . तेवढ्याच निधीत हि यंत्रणा कार्यान्वित होणे शक्य आहे. तरी हा कचरा संकलन पूर्ववत ठेवावे . आज पुणे महापालिकेच्या वतीने कोणतीही सोयी-सुविधा नाही. तसेच पथदिवे देखील अनेक दिवसापासून बंद असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास आहे .

पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त असताना ‘स्वच्छ’ चे कर्मचारी घरो घरी जात आहेत यामुळे सध्या नागरिकांचा रोष वाढत आहे . हे असेच चालू राहिले तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन उभारून स्वच्छ कंपनीला हुसकावून लावण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा पियुषा किरण दगडे पाटिल यांनी दिला आहे.


कोथरुडमध्ये गाड्यांच्या काचा फोडून सीडी प्लेअर चोरणारा सिसीटिव्ही मध्ये कैद

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये