मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मध्ये ६१ झाडांचे वृक्षारोपण ..

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणासाठी कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटीच्या टेकडीवर ६१ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. Plantation of 61 trees in Kothrud on the occasion of Chief Minister Uddhav Thackeray’s birthday.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, विधानसभा संघटक उमेश भेलके, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सभासद जयदीप पडवळ, विधानसभा समन्वयक अजय भुवड, नितीन पवार, विशाल भेलके, आप्पा भेलके, अनुप काळे, अक्षय वाघ, व शिवसैनिक उपस्थित होते.

उमेश भेलके म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात ऑक्सीजनचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे. त्यामुळे नैसर्गिक ऑक्सीजनकरीता व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. शिवसेना पक्ष कायमच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे असतो. मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी पक्षाने घेतलेली भूमिका त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कायमच कार्यकर्त्यांना पर्यावरण रक्षणासाठी मार्गदर्शन करत असतात, त्यानुसारच आज ६१ देशी झाडे लावण्यात आली आहेत व या लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी ही घेण्यात आली आहे.
कार्यक्रम चे संयोजन,शिवसेना विधानसभा संघटक उमेश भेलके, अजय भुवड वृक्ष प्राधिकरण मा.सभासद.जयदीप पडवळ यांनी केले होते.









