पुणे शहर

कवी हनुमंत चांदगुडे यांना काव्यानंद साहित्य कला पुरस्कार प्रदान..

कर्वेनगर : काव्यानंद साहित्य कला प्रतिष्ठान पुणेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्य स्पर्धा २०२२ चे तसेच काव्यानंद साहित्य कला पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुधाने लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांना काव्यानंद साहित्य कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ” माणसे वाचणारे साहित्य हेच समृद्ध साहित्य असते” असे मत हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेत राज्यस्तरीय पातळीवरील सुमारे ७० निवडक कवींनी सहभाग घेत आपल्या काव्य रचना सादर केल्या. तेजल दुधाने आणि माणिकशेठ दुधाने यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. काव्यानंद साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण नेहरकर यांनी प्रास्ताविक करताना हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला.  पुरुषोत्तम सदाफुले, ज्योत्स्ना चांदगुडे आणि कवी राजेंद्र वाघ यांनी यांनी काव्य स्पर्धेसाठी परीक्षण केले.

या स्पर्धेत अहमदनगर येथील निर्मला सुराणा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शरद पाटील यांना द्वितीय तर मीना सातपुते यांना तृतीय क्रमांक मिळाला. दिनेश शिर्के व मनीषा आवेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या प्रसंगी प्रवीण दुधाने, विद्या अटक ,रुपाली करडिले आणि इतर  मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला खानविलकर यांनी केले तर आभार दादा खंडाळे यांनी मानले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45
Img 20220225 wa00038702747946855041624

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये