पुणे शहर

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिवसेनाच सामान्यांचा आधार- रवींद्र मिर्लेकर

पुणे : आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम करीत आहे. सामाजिक कार्यामध्ये शिवसैनिक उत्साहाने पुढे येतात. बाळासाहेब मालुसरे या विभागात चांगले कार्य करीत आहेत, समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करण्याची त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे, भविष्यातही ते चांगले काम करतील, असे शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे पुणे शहर उपशहरप्रमुख आणि मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दोन हजार महिलांना छत्री, २०० रिक्षाचालकांना रेशनचे कीट व विश्रामबागवाडा, फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनला १५ बॅरिगेट्स भेट दिल्या.

Img 20210617 wa0021

याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र नेर्लेकर, पुणे शहर संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, राजाभाऊ भिलारे, सूरज लोखंडे, अमृत पठारे, सुदर्शना त्रिगुणाईत, निर्मला केंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोना महामारी संपली नाही, त्यामुळे प्रत्येकाने सावधानता बाळगण्याची गरज आहे. येथील जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी महापालिकेमध्ये समिती स्थापन झाली आहे, त्यामुळे तोही प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.

Img 20210522 wa0204

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये